शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे चुकवताना दुचाकीची धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:53 IST

खड्डे चुकवताना दुचाकीस्वार वळणावरील एसटी बसची धडक बसून मोटारसायकल चालक युवक ठार तर दोन जण गंभीर झाले.

ठळक मुद्देरावेर-अजंदे रस्त्यावरील दुर्घटना, रावेर -मुक्ताईनगर बसचालकाविरूध्द गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : खड्डे चुकवताना दुचाकीस्वार वळणावरील एसटी बसची धडक बसून मोटारसायकल चालक युवक ठार तर दोन जण गंभीर झाले.  रावेर- अजंदे रस्त्यावरील दुर्घटना नागझिरी नाल्याचे पुढील वळण रस्त्यावर मंगळवारी सकाळी ७.५० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर अजंदे मार्गे मुक्ताईनगर बसचालकाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील १५ पपई मजूर कामगारांचा ट्रक अपघातात सोमवारी बळी गेल्याचे घटनेला दिवस उजडतो न उजडतो तोच आज शहरालगतच्या नवीन विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या अजंदा रस्त्याने धामोडीहून रावेरकडे येणारे मोटारसायकलस्वार रस्त्यावरील मोठ मोठी खड्डे चुकवत असतांना त्यांना रावेर आगारातून सकाळी ७:४० वाजता सुटलेल्या अजंदे मार्गे रावेर - मुक्ताईनगर एस टी बस रावेरकडून अजंद्याकडे जात असताना समोरून धडक बसली. त्यात धामोडी येथील मावशीकडे शिक्षणासाठी आलेल्या विठ्ठल बाळू पाटील (वय २३) (मूळ रा.मोहराळे, ता.यावल) याच्या डोळ्याला, मेंदूला व हातापायांना तर मोटारसायकलवर लिफ्ट मागून आलेल्या धामोडी हायस्कूलचे शिपाई गोकुळ बाबूराव पाटील (वय ५५) व माजी आमदार अरूण पाटील यांचे स्वीय सहाय्यक रमेश पाटील यांचा मुलगा सचिन रमेश पाटील (वय १२) या दोघांना मेंदूस व पायाला गंभीर दुखापत झाली.  

दरम्यान, बसवाहक सागर तायडे यांनी १०८ रूग्णवाहिकेला दूरध्वनीवर तातडीने संपर्क साधून पाचारण केले असता त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी. महाजन यांनी तातडीने औषधोपचार करून पुढील अत्यावश्यक उपचारासाठी जळगावला हलवले असता विठ्ठल बाळू पाटील (वय २३) (मूळ रा.मोहराळे) या एम.एस.स्सी.चे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या युवकाचा करूण अंत झाला. त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले, तर गंभीर अत्यावस्थेतील धामोडी हायस्कूलचे शिपाई गोकुळ बाबूराव पाटील (वय ५५) व माजी आमदार अरूण पाटील यांचे स्वीय सहाय्यक रमेश पाटील यांचा मुलगा सचिन रमेश पाटील (वय १२) या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनाही औरंगाबाद येथे हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. 

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरAccidentअपघात