शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यात रणाईचे येथे दोन खळ््यांना आग लागून सहा लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:48 IST

पिंगळवाड्यालाही आगीत घराला आग

अमळनेर : उष्णतेमुळे अचानक दोन खळ््यांना आग लागल्याने ३ म्हशी गंभीर जखमी होऊन चारा व शेती अवजारे जळून ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील रणाईचे येथे घडली. यासोबतच पिंगलवाडे येथेही घर जळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.रणाईचे येथील दिलीप अजबराव पाटील तसेच आधार राघो पाटील यांच्या खळ््याला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या वेळी चाऱ्याने तत्काळ पेट घेतल्याने चाहुबाजुने आगीचे लोळ उठले. खळ्यात म्हशी बांधलेल्या असल्याने त्या ओरडू लागल्या. त्या वेळी गावकऱ्यांनी धाव घेत मिळेल त्या साधनाने पाणी मारणे सुरू केले. मात्र उष्णतेमुळे जवळ उभे राहणे ही कठीण झाले होते. त्याचवेळी रणाईचे येथून जानव्याला पिण्याचे पाण्याचे टँकर नेणाºया चालकाला दुरून आग दिसली त्या वेळी तो २ किमी अंतरावरून मागे परतला आणि टँकरमधील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही आग आटोक्यात आली नाही. त्या वेळी नगरपालिकेचे दोन बंब मागविण्यात आले. अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार, फारुख शेख, जाफर खान, मच्छिंद्र चौधरी, दिनेश बिºहाडे, भिका संदानशीव, रफिक खान, आकाश बाविस्कर यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दोन तासानंतर आग आटोक्यात आली. आगीत दिलीप पाटील याच्या मालकीचा तीन लाखाचा चारा व एक लाखाचे शेती अवजारे जळून खाक झाले तर आधार राघो पाटील यांचे २ लाखाचे नुकसान झालयाचे सांगण्यात आले. गावकऱ्यांनी तीन म्हशी खळ््यातून बाहेर काढल्या. म्हशी गंभीर जखमी झाल्या.पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.बी.भोई, एस. बी .रामोळ, एम. एस. पाटील, पी. ए. पाटील यांनी वेळीच म्हशींवर उपचार केल्याने म्हशींचे प्राण वाचले. तलाठी बाविस्कर यांनी पंचनामा केला.तालुक्यातील पिंगलवाडे येथे २८ रोजी रात्री साडे अकरा वाजता लागल्याने गौतम दगा पारधी यांच्या घराला आग लागल्याने कपडे व वस्तूंसह संपूर्ण घर जळून खाक झाले. यात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. अमळनेर नगरपरिषदेच्या बंबाने आग विझवली.

टॅग्स :Jalgaonजळगाव