महामार्गावरील अपघातात शाळकरी मुलीसह दोन जखमी
By Admin | Updated: November 17, 2014 12:04 IST2014-11-17T12:04:53+5:302014-11-17T12:04:53+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जान्हवीजवळ रविवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास सायकलवर जात असलेल्या शाळकरी मुलींना अपघात झाला असून यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

महामार्गावरील अपघातात शाळकरी मुलीसह दोन जखमी
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जान्हवीजवळ रविवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास सायकलवर जात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल, टँकर आणि सायकलच्या अपघातात का.उ. कोल्हे विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी मानसी हेमंत पाटील (१७) रा. अयोध्यानगर, मोटारसायकलस्वार युवराज पीतांबर भंगाळे (२६) रा.गीताईनगर हे दोघे गंभीर जखमी झाले, तर कैलास लक्ष्मण नेमाडे (२२) रा. खेडी या युवकाला मुका मार लागला आहे.
युवराज आणि कैलास औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून दुचाकीवर (एम.एच.१९, ९९0५) शहराकडे येत होते. याचवेळी मानसी ही सायकलवरून अयोध्यानगरातील घरी चालली होती. युवराजच्या पायावरून टँंकरचे चाक गेले असून मोटारसायकलचा चुराडा झाला आहे, तर कैलास बाजूला फेकला गेल्याने बालंबाल बचावला. मानसीचा उजवा पाय फ्रॅर आहे. तिघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानसीला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संतप्त जमावाने टँकरवर दगडफेक करीत समोरच्या काचा फोडल्या. तसेच या परिसरात बंद पडून असलेल्या ट्रकच्याही (सी.जी.0७, ९५0५) काचा फोडल्या