शेतकऱ्यासह दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST2021-04-20T04:16:37+5:302021-04-20T04:16:37+5:30

जळगाव : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून अमोल पांडुरंग चौधरी (वय ४९, रा. खेडी बु., ता. जळगाव) या शेतकऱ्यासह सालदार ...

Two, including a farmer, were beaten with wooden sticks | शेतकऱ्यासह दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण

शेतकऱ्यासह दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण

जळगाव : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून अमोल पांडुरंग चौधरी (वय ४९, रा. खेडी बु., ता. जळगाव) या शेतकऱ्यासह सालदार दारासिंग पावरा या दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी भूषण रघुनाथ सपकाळे आणि प्रवीण गोकुळ सपकाळे (रा. खेडी बु.) या दोघांविरुद्ध सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल पांडुरंग चौधरी हे रविवारी सकाळी ८ वाजता सालदार दारासिंग पावरा याच्यासोबत (क्र.एम.एच १८ वाय. ७८८६) क्रमांकाच्या दुचाकीने शेतावर जात असताना समोरून येणाऱ्या भूषणच्या दुचाकीचा त्यांच्या दुचाकीला कट लागला. यावर अमोल चौधरी यांनी गाडी व्यवस्थित चालवा, असे सांगितले असता त्याचा राग आल्याने भूषण सपकाळे व प्रवीण सपकाळे यांनी अमोल चौधरी यांचा रस्ता अडवून शिवीगाळ केली व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात अमोल चौधरी व सालदार पावरा दोघे जखमी झाले. दोघांनी उपचार घेतल्यानंतर सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुशील पाटील करीत आहे.

Web Title: Two, including a farmer, were beaten with wooden sticks