शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

जळगावात दोन गटात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:45 IST

सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात मंगळवारी रात्री आठ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात शाहीद कलीम पटेल (वय १६) व अल्ताफ शकील पटेल (वय १७) दोन्ही रा. ताजनगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देदुकानासमोर वाद घालू नका सांगितल्याने केली मारहाणकुलर विक्रीच्या दुकानासमोर सुरु होता चौघांचा वादपोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढून केले वातावरण शांत

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ : सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात मंगळवारी रात्री आठ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात शाहीद कलीम पटेल (वय १६) व अल्ताफ शकील पटेल (वय १७) दोन्ही रा. ताजनगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात शाहीद या तरुणाचे कुलर विक्रीचे दुकान आहे. त्याच्या दुकानासमोर विलास रतन राठोड, मनोज भटू गोसावी, संदीप अडकमोल व चंदू पांडे यांच्यात आपसात वाद व दगडफेक सुरू होती. शाहीद या तरुणाने चौघांना माझ्या दुकानासमोर वाद घालू नका, दुसरीकडे जा असे सांगितले असता या चौघांनी शाहीद यालाच मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या मदतीसाठी आलेल्या अल्ताफ यालाही त्यांनी मारहाण केली.दोन जण फरारहा वाद झाल्यानंतर शाहीद व त्याच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. दोन गटातील वाद व तणावाची स्थिती असल्याने पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजाराम पाटील, रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर व सतीश गर्जे यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात रवाना करून घटनास्थळ गाठले. तेथे लोकांची समजूत घालून वातावरण शांत केले.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस