शहापूरजवळील अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू
By Admin | Updated: April 2, 2017 11:19 IST2017-04-02T11:19:16+5:302017-04-02T11:19:16+5:30
इच्छापूर-इंदौर राज्यमार्ग क्रमांक 27 वर शहापूर गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
शहापूरजवळील अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू
क्रमांक 27 वर शहापूर गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेसात वाजता झाली.
दीपक अरुण बोदडे (25, चापोरा, जि़ब:हाणपूर) व शुभम राजेंद्र मोरे (24, चापोरा, जि़ब:हाणपूर) अशी ठार झालेल्या मित्रांची नावे आहेत़
ब:हाणपूरहून शहापूरकडे दुचाकीने दोन्ही मित्र जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा करुण अंत झाला़ अपघातानंतर चापोरा गावात शोककळा पसरली़ व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली़
दरम्यान, मयत शुभम हा पुण्यात खाजगी कंपनीत कामाला असल्याचे तर दीपक हा भोपाळ येथे आयटीआयचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आल़े शहापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरार्पयत नोंद करणे सुरू होत़े (वार्ताहर)