दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:35 IST2019-08-20T21:35:39+5:302019-08-20T21:35:51+5:30
जळगाव कर्जामुळे निराश झालेल्या दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि पारोळा तालुक्यातील शिवरे येथे घटली. पातोंडा ...

दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या
जळगाव कर्जामुळे निराश झालेल्या दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि पारोळा तालुक्यातील शिवरे येथे घटली.
पातोंडा रस्त्यावर घेतला गळफास
पातोंडा, ता.अमळनेर येथील संजय दगडू भदाणे (५२) या शेतकºयाने १९ रोजी रात्री पातोंडा-नांद्रीदरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाच्या कठड्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांची एक एकर शेतजमीन आहे. सततच्या नापिकीमुळे तसेच उसनवारीच्या पैशांच्या बोजामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू साळुंके करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते विनोद भदाणे यांचे भाऊ होत.
शिवरे येथे घेतले विष
पारोळा तालुक्यातील शिवरे येथील सचिन मधुकर लिंडायत (वय ३७) या शेतकºयाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. ही घटना २० रोजी सकाळी उघडकीस आली. सचिन हे झोपलेल्या स्थितीत असताना त्यांना उठविण्यासाठी प्रविण लिंडायत हे गेले असता हा प्रकार लक्षात आला.
प्रवीण लिंडायत यांच्या खबरीवरुन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास आशिष चौधरी करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.