हद्दपार केलेल्या दोन आरोपींना भुसावळला अटक
By Admin | Updated: May 16, 2017 15:35 IST2017-05-16T15:35:33+5:302017-05-16T15:35:33+5:30
गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याने हिरामण उर्फ गोज:या समरु जाधव व जय मुकेश ठाकूर, दोघे रा. भुसावळ यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार केलेल्या दोन आरोपींना भुसावळला अटक
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 16 - गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या दोन जणांना हद्दपार केल्यानंतरही ते भुसावळ शहर व परिसरात आढळून आल्याने दोघांना गुन्हे शोध शाखेच्या पथकाने अटक केली.
गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याने हिरामण उर्फ गोज:या समरु जाधव व जय मुकेश ठाकूर, दोघे रा. भुसावळ यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपारीचे आदेश धुडकावून ते भुसावळ व परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, विकास सातदिवे, संजय पाटील, प्रवीण ढाके, अनिल पाटील आदींनी ही कारवाई केली.