जिल्हाभरात उद्या चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:57+5:302021-02-05T06:00:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या लसीकरणामुळे पुढे ढकलण्यात आलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी सर्वत्र राबविली ...

जिल्हाभरात उद्या चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या लसीकरणामुळे पुढे ढकलण्यात आलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी सर्वत्र राबविली जाणार असून जिल्ह्यातील शून्य ते ५ वर्ष वयोगटातील ३ लाख ७२,१६४ बालकांना पोलिओ डोस दिले जाणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
यंदा कोरोनामुळे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहेत. जी बालके या लसीकरण मोहिमेतून सुटतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत ६ हजार ८३८ घरे कव्हर केली जाणार आहेत. केवळ बूथ नव्हे तर ज्या ठिकाणी बूथ नसतील अशा ठिकाणी मोबाइल पथकांसह विविध पथके पोहचून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात यासाठी २६५४ बूथ लावण्यात येणार असून प्रत्येक पालकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातील चिमुकल्यांना पोलीस डोस पाजून घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कुठे ३ तर कुठे दोन कर्मचारी
१ जिल्हाभरातील १,९०९ बूथवर ३ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तर ७४५ बूथवर २ कर्मचारी कार्यरत असतील.
२ कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रत्येक बूथवर सॅनिटायझर, हॅण्ड वॉश ठेवण्यात येणार आहे. यासह सर्व आपत्कालिन किट, सुरक्षा साहित्य उपलब्ध राहणार आहे.
३ सुरुवातीला १७ जानेवारीला ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, कोरोना लसीकरणाच्या नियोजनात हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
४ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच ही मोहीम राबविली जाणार असून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क प्रत्येक कर्मचाऱ्याला वापरणे बंधनकारक राहणार आहे.
अशी असेल मोहीम
० ते ५ वर्ष बालके - ३,७२,१६४
प्राप्त पोलिओ डोस : ३,७२,१६४
बूथ- २,६५४
पर्यवेक्षक ५२८
सर्व कर्मचारी - ७,२६९
ट्रांझिट पथक - १३५
मोबाइल पथक -१८१
घरे - ६८३८
वेळ - सकाळी ८ ते सायंकाळी ५
सर्व नियम पाळून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. यासाठी बूथ, कर्मचारी निश्चित करण्यात आले असून प्रशासन या लसीकरण मोहिमेसाठी सज्ज आहे. ० ते ५ वयोगटातील आपल्या बालकांना जवळच्या केंद्रावर जाऊन पोलिओची लस पाजून घ्या. - डॉ. बी.टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी