चाळीसगावातील दोघे दिव्यांग बनले परस्परांचा आधार

By Admin | Updated: May 23, 2017 18:01 IST2017-05-23T18:01:35+5:302017-05-23T18:01:35+5:30

स्वयंदीप केंद्राच्या पुढाकाराने चाळीसगाव येथील दोघे दिव्यांग परस्परांच्या जीवनाचा आधार बनले असून हा विवाह सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला

Two divisions of forty-fours formed mutual support | चाळीसगावातील दोघे दिव्यांग बनले परस्परांचा आधार

चाळीसगावातील दोघे दिव्यांग बनले परस्परांचा आधार

 ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव,दि.23- दिव्यांगासाठी कार्यरत येथील स्वयंदीप केंद्राच्या पुढाकाराने चाळीसगाव येथील दोघे दिव्यांग परस्परांच्या जीवनाचा आधार बनले असून हा विवाह सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला
अपंग बहुउद्देशीय संस्थेचा पाया रचून अपंगांचे आयुष्य फुलविणा:या मीनाक्षी निकम यांच्याशी 16 वषार्पासून ऋणानुबंध ठेवणा:या मनिषा चौधरी ही राकेश खैरनार यांच्याशी 23 रोजी विवाहबध्द झाली. वर- वधू हे दोघेही  चाळीसगाव येथीलच रहिवासी असून पोलीओमुळे एका  पायाने अपंग  (दिव्यांग) आहे. या विवाहामुळे ते आता एकमेकांचे आधार बनले आहे. हा विवाह सोहळा 23 रोजी दुपारी शहरातील आर.के.लॉनवर पार पडला.   
मनिषा चौधरीच्या वडिलांचे चहाचे दुकान असून त्यांची आर्थिक स्थिती साधारण आहे. मनिषा अपंग असली तरी वडिलांवर भार  न राहता तिने   फॅशन डिझाईनचे काम शिकून ‘स्वयंदीप केंद्रा’च्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरु केला तर राकेश याचे वडील बांधकाम ठेकेदाराकडे कामास आहेत. राकेश याने भाडय़ाचे दुकान घेत संगणक ऑपरेटरचे काम सुरु केले आहे. या विवाहासाठी भारती चौधरी यांनीही पुढाकार घेतला.

Web Title: Two divisions of forty-fours formed mutual support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.