डेंग्यूचे दोन, मलेरियाचे पाच रुग्ण़़़!
By Admin | Updated: September 25, 2015 00:08 IST2015-09-25T00:08:40+5:302015-09-25T00:08:40+5:30
धुळे : 9 महिन्यांच्या कालावधीत महापालिका हद्दीत 2 डेंग्यूचे, तर मलेरियाचे 5 रुग्ण आढळून आले आहेत़ त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली़

डेंग्यूचे दोन, मलेरियाचे पाच रुग्ण़़़!
धुळे : जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत महापालिका हद्दीत 2 डेंग्यूचे, तर मलेरियाचे 5 रुग्ण आढळून आले आहेत़ त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली़ गेल्या 9 महिन्यांच्या काळात 30 डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होत़े त्यात दोघांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाल़े त्यापैकी एक मोहाडी उपनगरातील, तर एक नकाणे रोड परिसरातील आह़े याशिवाय सुमारे 30 हजार रुग्णांचे मलेरियाबाबत रक्ताचे नमुने घेण्यात आले होत़े त्यात 5 जणांना मलेरिया आढळला आह़े या सर्वाची प्रकृती स्थिर आह़े घरगुती व घराच्या परिसरातील डासोत्पत्ती स्थानके नष्ट करावीत, घरातील सर्व पाण्याच्या साठय़ांना हवाबंद झाकण लावाव़े जेणेकरून डास आत जाऊन अंडी घालणार नाही़ आठवडय़ात एक दिवस कोरडा दिवस पाळा, कूलर, फ्रिज व फुलदाणी नियमित स्वच्छ करावी़ परिसरातील खड्डे, डबके बुजवावीत़, गटारी वाहत्या कराव्यात़ फुटके टायर, फुटक्या कुंडय़ा, फुटक्या बाटल्या यांची विल्हेवाट लावावी, असे आवाहन मलेरिया विभागाने केले आह़े