तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने चाळीसगावचे दोन नगरसेवक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:38 IST2018-01-31T13:38:16+5:302018-01-31T13:38:23+5:30
अपात्र ठरवणारा निर्णय

तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने चाळीसगावचे दोन नगरसेवक अपात्र
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31 - अमळनेर येथील नगराध्यक्ष व 22 नगरसेवक अपात्र विषय चर्चेत असताना मंत्रालयातून त्यास स्थगिती मिळाल्या नंतर आज चाळीसगावच्या दोन नगरसेवकांना तिसरे अपत्य जन्माच्या कारणावरुन अपात्र ठरवणारा निर्णय जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे.
चाळीसगाव नगरपालिकेच्या नगरसेविका बेग यास्मिनबी फकीरा बेग आणि शंकर रामा पोळ अशा दोन नगरसेवकांचा यात समावेश आहे. दोघांकडे 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य जन्माला आल्याचे सिध्द झाल्याने त्यांना अपात्र ठरवणारा निर्णय मंगळवारी जिल्हाधिका-यांनी दिला. या प्रकरणी माजी नगरसेविका प्रमिला आबा चौधरी व माजी नगरसेवक मालजी झुबा घोडेस्वार यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. तक्रारदारांतर्फे अॅड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.