शेंदुर्णीत गणपती विसर्जन करताना दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:34 IST2017-09-06T17:27:46+5:302017-09-06T17:34:24+5:30
गणपती मूर्तीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या पाण्यात बुडून दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घडली. जीवन (सागर) संतोष धनगर (वय १८) व योगेश पुना धनगर (वय १९) अशी मयत मुलांची नावे आहेत.

शेंदुर्णीत गणपती विसर्जन करताना दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू
आॅनलाईन लोकमत
शेंदुर्णी, ता. जामनेर, दि.६ - गणपती मूर्तीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या पाण्यात बुडून दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घडली. जीवन (सागर) संतोष धनगर (वय १८) व योगेश पुना धनगर (वय १९) अशी मयत मुलांची नावे आहेत.
येथील श्यामसिंग बुवा धरणात गणपती विसर्जनासाठी काही युवक गेले होेते. घरगुती स्वरुपातील गणपतीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या बांधावरून या युवकांचा पाय घसरला. त्यात जीवन धनगर व योगेश धनगर हे धरणाच्या विहिरीत पडले. यांना वाचविण्यासाठी इतर युवकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या दोघांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही युवक इयत्ता अकरावी कला शाखेत शिक्षण घेत होते.