जामद्याच्या दोन बालिकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 14:18 IST2017-06-30T14:18:36+5:302017-06-30T14:18:36+5:30

खेळता खेळता पडल्या पाण्याच्या डबक्यात

Two children of Jamadera drowned in death | जामद्याच्या दोन बालिकांचा बुडून मृत्यू

जामद्याच्या दोन बालिकांचा बुडून मृत्यू

ऑनलाईन लोकमत

जामदा ता. चाळीसगाव,दि.30 - गावाजवळील खजिना महादेव मंदिराच्या बाजुला असलेल्या पाटाच्या पाण्याच्या डोह सदृष्य डबक्यात बुडून  दोन बालिकांचा मृत्यू झाला. ही घटना 29 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
छायाबाई नवसरे (रा.हेंद्रुन ता.धुळे) या गुरुवारी माहेरी आलेल्या होत्या. त्यांची लहान  मुलगी रितु आबा नवसारे (वय 4) ही तिचा चुलत मामा वाल्मिक सुभाष काकडे यांची मुलगी भाग्यश्री वाल्मिक काकडे ( वय 3) हिच्या सोबत खेळत होती. खेळता खेळता त्या जवळच असलेल्या खजिना महादेव मंदिराजवळील पाटाच्या पाण्यात पडल्या. या ठिकाणी कुणीच नसल्याने दोन्ही बालिकांचा पाण्यात  बुडून मृत्यू झाला. या दोन्ही बालिकांसोबत गणेश वाल्मिक काकडे (वय 5) व कार्तिक भोलेनाथ काकडे (वय 4) हे देखील होते. त्यांनी घरी येत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली.
राजेंद्र काकडे यांनी पाण्यात उतरून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. भाग्यश्री ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. रात्री दहा वाजेच्या दरम्यान दोघा बालिकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.

Web Title: Two children of Jamadera drowned in death