मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने दोन म्हशींचा मृत्यू
By Admin | Updated: September 30, 2015 23:48 IST2015-09-30T23:48:02+5:302015-09-30T23:48:02+5:30
नंदुरबार : मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने अक्कलकुवा येथे दोन म्हशींचा मृत्यू झाला. याबाबत ढेप विक्रेत्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने दोन म्हशींचा मृत्यू
नंदुरबार : मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने अक्कलकुवा येथे दोन म्हशींचा मृत्यू झाला. याबाबत ढेप विक्रेत्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथील महावीर किराणा दुकानाचे मालक प्रवीण जेठमल जैन हे आपल्या दुकानात ढेप विक्री करतात. गावातीलच संजयनगर भागातील महंमद नाबीस महंमद युसुफ मक्राणी यांनी ढेप खरेदी केली. नेहमीप्रमाणे त्यांनी ती ढेप आपल्या म्हशींना खाऊ घातली. ढेप खाताच विषबाधा होऊन त्यातील दोन म्हशींचा मृत्यू झाला. ढेप खाल्ल्यानंतर हा प्रकार घडल्याने मक्राणी यांना शंका आली. त्यांनी अधिक तपास केला असता प्रवीण जैन यांनी मुदत संपलेली ढेप विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर मक्राणी यांनी पोलीस ठाणे गाठून जैन यांच्याविरुद्ध एक लाख दहा हजार रुपयांच्या दोन म्हशींच्या मृत्यूप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार थेटे करीत आहेत.