महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : पारोळा-भडगाव रस्त्यावर वलवाडी गावाजवळ कार (जीजे-०५-आरबी-०८३९) व मोटारसायकल (एमएच-१९-बीके-८४९२)ची समोरासमोर धडक होऊन त्यात दोन सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले. पोलीस कॉन्स्टेबल भानुदास भीमराव देवरे (वय ४८) व रामदास विनायक देवरे (वय ५२) दोन्ही रा.महिंदळे, ता.भडगाव अशी मयतांची नावे आहेत, तर वंदनाबाई भानुदास देवरे जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी चारला हा अपघात झाला.कन्हेरे, ता.अमळनेर येथे नातलगाकडे घरभरणीच्या कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल भानुदास देवरे हे पत्नी वंदनासह आले होते. तेथे चुलतभाऊ रामदास देवरेही आले होते. कार्यक्रम आटोपून रामदास देवरे पाचोरा येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांनी या दोघांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला व एकाच मोटारसायकलने तिघेही पाचोरा जाण्यासाठी निघाले. परंतु पारोळा-भडगाव रस्त्यावर वलवाडी गावाजवळ त्यांच्यावर काळाने झडप घातली. मोटारसायकल व कारचा भीषण अपघात झाला व दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात वंदनाबाई गंभीर जखमी झाली आहे.मूळ महिंदळे येथील रहिवासी असलेले भानुदास देवरे हे तारापूर-पालघर येथे पोलीस कॉन्स्टेबल, तर रामदास देवरे पाचोरा येथे फोटोग्राफी करीत होते.दोघा मयतांच्या पश्चात मुलगा व मुलगी पत्नी असा परिवार आहे. दोघांवर महिंदळे येथे १६ रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भडगाव तालुक्यात अपघातात दोन भाऊ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 19:58 IST
पारोळा-भडगाव रस्त्यावर वलवाडी गावाजवळ कार (जीजे-०५-आरबी-०८३९) व मोटारसायकल (एमएच-१९-बीके-८४९२)ची समोरासमोर धडक होऊन त्यात दोन सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले.
भडगाव तालुक्यात अपघातात दोन भाऊ ठार
ठळक मुद्देकार व मोटारसायकलची समोरासमोर धडकएक पोलीस दलात तारापूर पालघर येथे कार्यरत, तर दुसरा फोटोग्राफरघरभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते नातलगाकडेदोघे मयत सख्खे चुलत भाऊ