दोघा भावांचे एकाच दिवशी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:47 IST2019-08-30T14:47:05+5:302019-08-30T14:47:26+5:30

दोघा भावांचे एकाच दिवशी निधन

Two brothers die in one day | दोघा भावांचे एकाच दिवशी निधन

दोघा भावांचे एकाच दिवशी निधन


xवाघडू, ता. चाळीसगाव : येथील अतिशय गरीब कुटुंबातील दोन्ही सख्ख्या चुलत भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. भाऊबंदकीतील दोन कुटुंबातील दोघे प्र्रमुख गेल्याने या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दोन्ही भावांमध्ये स्नेह होता. या दोघांनीही केवळ दोन तासांच्या अंतराने जगाचा निरोप घेतल्याने दोघांमधील अतूट प्रेमाची गावामध्ये चर्चा असून एका दिवसावर येऊन ठेपलेल्या पोळा सणाच्या दरम्यान हे दु:ख गावात कोसळले आहे.
एका भिंतीला लागूनच रहात असलेले एकाच भाऊबंदकीतील चैत्राम महाले (वय ६४) व चुडामण महाले (वय ६६) हे रोज स्वता:ची शेती करून परिवाराचा रहाटगाडा चालविण्यासाठी आपले जिवलग सर्जा-राजाच्या मदतीने दुसऱ्याची शेती भाड्याने कसायचे. परंतु एक भाऊ आजारी पडल्याने दुसºयानेही हिंम्मत सोडली. दि.२९ रोजी गुरुवारी चुडामण महाले यांचे पहाटे ३ वाजत निधन झाले. तर चैत्राम महाले यांचे पहाटे ५ वाजता निधन झाले.
एकाच दिवशी दोन्ही भाऊ गेल्याने उद्याचा पोळा या कुटुंबासाठी नसल्यासारखाच आहे.

Web Title: Two brothers die in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.