वसुली विभागाकडून दोन गाळे ‘सील’
By Admin | Updated: September 24, 2015 00:09 IST2015-09-24T00:09:27+5:302015-09-24T00:09:27+5:30
धुळे : मनपाच्या वसुली विभागाने दुस:या दिवशी मालमत्ता कर थकबाकी वसुली मोहिमेदरम्यान दोन व्यावसायिक गाळे सील केल़े.

वसुली विभागाकडून दोन गाळे ‘सील’
धुळे : मनपाच्या वसुली विभागाने दुस:या दिवशी मालमत्ता कर थकबाकी वसुली मोहिमेदरम्यान दोन व्यावसायिक गाळे सील केल़े. वसुली विभागाच्या पथकाने शहरातील गल्ली नं. 5 मधील रंगारी व्यापारी संकुलातील गोपाळ अग्रवाल यांची दोन दुकाने सील केली़ त्यांच्याकडे 68 हजार 618 रुपये मालमत्ता कराची थकबाकी आह़े त्याचप्रमाणे मंगळवारी केलेल्या कारवाईतील सव्र्हे क्रमांक 1515 मधील मालमत्ताधारकाने थकबाकी रकमेपोटी 1 लाख 19 हजार 532 रुपयांचा धनादेश दिल्याने मालमत्तेवरील जप्तीची कारवाई वसुली विभागाने मागे घेतली़ तसेच अन्य एका मालमत्ताधारकाने 36 हजार रुपयांचा भरणा केल्याची माहिती वसुली विभागाने दिली़ कारवाई सुरू राहणार आह़े