गणपतीनगरात मध्यरात्री दोन दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST2021-05-03T04:11:05+5:302021-05-03T04:11:05+5:30
जळगाव : गणपतीनगरातील सम्राट हौसिंग सोसायटीत मध्यरात्री टवाळखोरांनी दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला ...

गणपतीनगरात मध्यरात्री दोन दुचाकी जाळल्या
जळगाव : गणपतीनगरातील सम्राट हौसिंग सोसायटीत मध्यरात्री टवाळखोरांनी दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, हिमांशू रवींद्र महाजन (रा. सम्राट हौसिंग सोसायटी) आपल्या परिवारासह राहतात. १ मे रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांची (एमएच- १५ एफबी- ७७०७) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. त्याच्या बाजूला येथील वाचमन यांची देखील (एमएच- १९ -९३२६) क्रमांकाची दुचाकी होती. मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुचाकींवर काही तरी केमिकल टाकून पेटवून दिल्या. यात दोन्ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. सोबत अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायर्स जळाल्या आहेत. याप्रकरणी सुनील पैहिलराज सुखवाणी (वय-४६) यांच्या फियादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.