शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

जळगाव येथे पोलीस व्हॅनच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:56 IST

महामार्गावर पुन्हा अपघात

ठळक मुद्देदूरदर्शन टॉवरजवळील घटना ५ पोलीस कर्मचारी व २ कैदी जखमी

जळगाव/नशिराबाद : भुसावळ न्यायालयातील कामकाज आटोपून सात कैद्यांना जळगावातील कारागृहात घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनने समोरून येणाºया दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात दुचाकीस्वार उमेश संजय वारूळे (वय-२३, रा़ शनिपेठ) हा तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेली तरूणी जयमाला प्रभाकर गायकवाड (वय-२६, रा़ हिवरखेडा ता़ जामनेर, ह.मु़भगवान नगर) हिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ घडली़ दरम्यान, या अपघातात उलटलेल्या पोलीस व्हॅनमधील ५ पोलीस कर्मचारी तर सात कैद्यांपैकी दोन कैदी जखमी झालेले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे़अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी भुसावळ न्यायालयात जिल्हा कारागृहातील सात कैद्यांच्या सुनावणीबाबत कामकाज होते़ त्यामुळे या सात कैद्यांना जिल्हा कारागृहातून भुसावळला पोलीस व्हॅनने (एमएच़१९़एम़०७१३) ने दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास हजर करण्यात आले होते. दुपारी न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर पुन्हा त्याच व्हॅनने कैद्यांना घेऊन शहराकडे येत असताना खेडीजवळील दूरदर्शन टॉवरजवळ समोरून येणारी दुचाकी (एमएच़१९़सीसी़८८३३) ओव्हर टेक करत असताना दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील उमेश संजय वारूळे हा तरूण जागीच ठार झाला़ तर दुचाकीवर मागे बसलेली जयमाला प्रभाकर गायकवाड ही गंभीर जखमी झाली़व्हॅन दोनदा उलटली; हे झाले जखमीअपघात झाल्यानंतर व्हॅनवरील चालक अनिल तायडे यांचे नियंत्रण सुटले़ अन् व्हॅन दोन वेळेस उलटली़ या घटनेत पोलिस कर्मचारी अनिल तायडे, प्रकाश काळे, गयाद्दीन शेख, दिलीप केंद्रे हे जखमी झाले. तर व्हॅनमधील आकाश गोसावी, गजानन जाधव,आकाश मोहने ह्या पोलीस कर्मचाºयांना मुकामार बसला. कैदी शेख कलीम शेख सलीम (वय-२७, रा़ भुसावळ),चंद्रभान सोनवणे (वय-२०,रा़जळगाव), सदाशिव पवार (वय-२१,रा़बोदवड), आनंद वानखेडे (वय-२३,रा़ यावल) आणि शेख अशरु शेख चांद (वय-३०,रा़बोदवड) हे किरकोळ जखमी झाले आहेत़ तर सुरेश बोदडे व भागवत सुर्यवंशी हे दोघं कैदी गंभीर जखमी झाले आहेत़ यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़दोन तासांनी दोघांची पटली ओळखअपघातानंतर जागीच ठार झालेला उमेश तर जखमी जयमाला या दोघांची ओळख पटत नव्हती़ अखेर दोन तासानंतर जिल्हा रूग्णालयात सुरक्षारक्षक असलेल्या तरूणाने जखमी तरूणीला पाहिल्यानंतर ती नातेवाईकच असल्याचे समोर आल्यानंतर ओळख पटली़ तर उमेश याच्या दुचाकीचा क्रमांकावरून ती दुचाकी कुणाची याचा एका पत्रकाराने शोध घेत मोबाईल क्रमांक मिळविला़ यानंतर दुचाकी मालक गणेश वारूळे यांना त्या पत्रकाराने रूग्णालयात बोलविले. गणेश वारूळे हे रूग्णालयात नातेवाईकांसह आल्यावर त्यांनी मृतदेह पाहताच तो पुतण्या असल्याचे ओळखले़ अन् जागेवर नातेवाईकांनी हंबरडा फोडला़क्रेनच्या मदतीने उचलली व्हॅनमहामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याच्याकडेला उलटलेली पोलीस व्हॅनला उचलण्यासाठी क्रेन बोलविण्यात आली़ उमेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेता होता़ तर तरूणी ही बाहेर स्कूलमध्ये कंत्राटी पध्दतीने कामाला होती़

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव