जळगावात दोन कारमधून लांबविल्या बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 13:00 IST2017-08-20T13:00:05+5:302017-08-20T13:00:46+5:30
नवी पेठेत दोन घटना : एका कारमधून 10 तर दुस:या कारमधून 5 हजारासह रोकड लंपास

जळगावात दोन कारमधून लांबविल्या बॅग
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 20 - नवी पेठेतील प्रभात सोडा दुकानाजवळून दोन वेगवेगळ्या कारमूधन चोरटय़ांनी दार उघडून त्यातील बॅग चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली. एका बॅगेत 10 हजारांची रोकड तर दुस:या बॅगेत 5 हजारांच्या रोकडसह 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला.
दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील बांधकाम ठेकेदार उज्ज्वलकुमार नामदेव बोरसे (वय 32) हे बॅँकेच्या कामानिमित्त शनिवारी दुपारी कारने (क्र.एम.एच. 19.सी.पी. 0091) जळगावात आले होते. नवीपेठेतील प्रभात सोडा दुकानाजवळ कार उभी करुन बँकेत गेले. कारचा दरवाजा बंद नसल्याची संधी साधत चोरटय़ांनी दहा हजार रुपये ठेवलेली बॅग चोरून नेली.उज्ज्वलकुमार हे काम आटोपून कारजवळ आल्यानंतर त्यांना कारमधील बॅग गायब झाल्याचे दिसून आले.
रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजता खासगी कामानिमित्त गेलेल्या सुभाष सुखदेव पाटील (वय 48 रा.वर्डी, ता.चोपडा, ह.मु.निवृत्ती नगर, जळगाव) यांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मारहाण करुन त्यांच्याजवळील सात हजार रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना उघडकीस आली.