साॅ मीलमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST2021-02-09T04:17:48+5:302021-02-09T04:17:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कानळदा रस्त्यावरील सॉ मीलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चोरी करणाऱ्या किरण अनिल बाविस्कर (वय ३०) व ...

साॅ मीलमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कानळदा रस्त्यावरील सॉ मीलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चोरी करणाऱ्या किरण अनिल बाविस्कर (वय ३०) व शंकर विश्वनाथ साबळे (२१, रा.गेंदालाल मील) या दोघांना शहर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सुधीर नटवरलाल शहा (५६, रा. महाबळ) यांच्या मालकीच्या सॉ मीलमधील खोल्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक्स ॲम्पियर, स्पीकर, वायर व इतर वस्तू असे ३० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी संशयितांचा शोध घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले होते. सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, रतन गीते, विजय निकुंभ, योगेश इंधाटे व तेजस मराठे यांच्या पथकाने संशयितांचा शोध घेऊन त्यांना राहत्या घरातूनच अटक केली. तपास उमेश भांडारकर करीत आहे.