हाणामारीप्रकरणी दोन अटकेत, १९ जण फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST2021-09-03T04:19:10+5:302021-09-03T04:19:10+5:30
शेंदुर्णी, ता. जामनेर : येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या दोन गटातील दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, ...

हाणामारीप्रकरणी दोन अटकेत, १९ जण फरार
शेंदुर्णी, ता. जामनेर : येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या दोन गटातील दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, १९ जण फरार आहेत.
सूत्रांनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली, यामध्ये चारचाकी चार गाड्या, दुचाकी १० व एसटीचे २० हजारांचे नुकसान झाले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहेत.
दरम्यान, बुधवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने शेंदुर्णी व परिसरातील नागरिकांनी दैनंदिन व्यवहार, व्यापारपेठ सुरळीत सुरू होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. दिवसभरात कुठलीही विपरीत घटना घडली नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिवसभर शेंदुर्णी गावात पाहणी सुरू होती.