शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 14:28 IST

जळगाव - घाणेकर चौकात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाशी हुज्जत घालणाऱ्या दोघं हॉकर्सवर गुन्हा दाखल होऊन त्यांना मंगळवारी 22 रोजी अटक ...

जळगाव - घाणेकर चौकात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाशी हुज्जत घालणाऱ्या दोघं हॉकर्सवर गुन्हा दाखल होऊन त्यांना मंगळवारी 22 रोजी अटक करण्यात आली आहे. शेख फारूक शेख यासिन व तौफिक शेख फारूक असे अटक झालेल्यांची नावे आहेत.होर्डिंगसह शहरातील शनीपेठ भागातील अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी काही हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर 8 हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. तरीही काही जणांकडून विरोध कायम होता. वाद वाढत असताना याबाबत पोलिसांना देखील सूचना देण्यात आल्या. यावेळी शेख फारूक शेख यासिन व तौफिक शेख फारूक यांनीही मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसाला शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला. दरम्यान वाद घालणाऱ्य दोघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद ज्ञानेश्वर तुकाराम कोळी या मनपाच्या कर्मचाऱ्याने दिली आहे. त्यानुसार मंगळवारी शेख फारूक, तौफिक या दोघांना शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या काळात मनपाने शहरात होर्डिंग्ज लावण्यात कोणतीही परवानगी दिली नसतानाही शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काढण्यात आले. तसेच जाहिरात करणाऱ्यांना मनपाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव