आयपीएलवर सट्टा खेळणा-या दोघांना अटक

By Admin | Updated: May 9, 2014 09:35 IST2014-05-09T00:51:22+5:302014-05-09T09:35:36+5:30

रिंगरोड भागातील जुने समाजकल्याण कार्यालयासमोरील इमारतीत आयपीएल (इंडियन प्रिमिअर लिग) वर सट्टा खेळणार्‍या दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन (वय-२२, दोघे रा.जळगाव) यांना गुरुवारी रात्री जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.

The two arrested on the IPL are arrested | आयपीएलवर सट्टा खेळणा-या दोघांना अटक

आयपीएलवर सट्टा खेळणा-या दोघांना अटक



जळगाव : शहरातील रिंगरोड भागातील जुने समाजकल्याण कार्यालयासमोरील इमारतीत आयपीएल (इंडियन प्रिमिअर लिग) वर सट्टा खेळणार्‍या दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन (वय-२२, दोघे रा.जळगाव) यांना गुरुवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. या दोघांकडून चार मोबाईल, टी.व्ही., सेट टॉप बॉक्स व काही रजिस्टर जप्त केले आहेत. या प्रकरणाशी संबधित दोघांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना गुरुवारी होत असलेल्या हैद्राबाद विरूद्ध राजस्थानच्या सामन्यावर स˜ा बेटींग घेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी साहाय्यक निरीक्षक किरण शिंदे, गणेश कदम, गिरधर निकम, कर्मचारी विजय पाटील, बंडू पटवर्धन, बापूराव भोसले, चंद्रकांत पाटील, दिनेश बडगुजर, सुभाष मिस्तरी, नरेंद्र वारुळे, शशीकांत पाटील, जयंत चौधरी यांच्यासह कर्मचार्‍यांचे पथक तयार केले.
या पथकाने रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास रिंगरोड जवळील भगवान आरडे यांच्या मालकीच्या इमारतीवर धाड टाकली. दुसर्‍या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये काही विद्यार्थी अभ्यास करीत होते तर दुसर्‍या खोलीत दोघे जण समोर सुरु असलेल्या हैद्राबाद विरुद्ध राजस्थानच्या सामान्याचे ऑनलाईन स˜ा बेटींग घेत होते.
पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी एकाच वेळी धाड टाकल्याने या ठिकाणी गोंधळ झाला. पोलिसांनी खोलीतील सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन यांच्याकडून रजिष्टर ताब्यात घेतले. या रजिष्टरवर हैद्राबाद विरूद्ध राजस्थानच्या सामन्यावर लावलेल्या ३२ हजार ४०० रुपयांचे आकडे तसेच नफा व तोटा किती याचा हिशोब लिहीलेला होता.
-------------
सामना सुरु झाला त्यावेळी हैद्राबाद संघावर ७० पैसे तर राजस्थान संघावर ७५ पैसे लावले होते. या दोघांनी आयपीएलच्या स˜ा बेटींगवर धु्रव आणि सागर मुंदळा नामक तरुणाच्या सहभागाची कबुली दिली आहे.

Web Title: The two arrested on the IPL are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.