रिक्षा लांबविणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST2021-07-05T04:12:16+5:302021-07-05T04:12:16+5:30

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधून रिक्षा लांबविणाऱ्या शाहरुख जहूर खाटीक (वय २५,रा. तांबापुरा) व फारुख शेख ...

Two arrested for delaying rickshaw | रिक्षा लांबविणाऱ्या दोघांना अटक

रिक्षा लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधून रिक्षा लांबविणाऱ्या शाहरुख जहूर खाटीक (वय २५,रा. तांबापुरा) व फारुख शेख मुस्तफा (वय ३२, रा. रझा कॉलनी) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.

गोपाळ युवराज चौधरी (वय ३५, रा. ज्ञानदेव नगर) यांची मालकीची रिक्षा (क्र.एम.एच.१९ व्ही.३६८८) ६ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता चोरी झाली होती. चौधरी हे भाजीपाला घेण्यासाठी आले होते. बाहेर रिक्षा पार्किंग करून भाजीपाला घेऊन परत येत नाही तितक्यात रिक्षा चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. सहायक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, योगेश बारी, जमीर शेख व इम्रान सय्यद यांनी संशयितांचा शोध घेऊन कारवाई केली. दरम्यान, अटकेतील दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: Two arrested for delaying rickshaw