थुंकल्यावरून दोन व र्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 19:50 IST2018-12-14T19:49:11+5:302018-12-14T19:50:51+5:30

थुंकल्याच्या कारणावरून मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी तालुक्यातील मानेगाव येथील आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड असा निकाल येथील न्यायालयाने दिला. न्यायाधिश संजीव सरदार यांनी १३ रोजी ही शिक्षा सुनावली.

Two and a half years of imprisonment from spit | थुंकल्यावरून दोन व र्षे कारावास

थुंकल्यावरून दोन व र्षे कारावास

ठळक मुद्देमुक्ताईनगर तालुक्यातील मानगाव येथील घटनापाच वर्षांपूर्वी घडली होती घटनादोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने ठोठावली शिक्षा

मुक्ताईनगर, जि.जळगाव : थुंकल्याच्या कारणावरून मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी तालुक्यातील मानेगाव येथील आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड असा निकाल येथील न्यायालयाने दिला. न्यायाधिश संजीव सरदार यांनी १३ रोजी ही शिक्षा सुनावली.
तालुक्यातील मानेगाव येथील विजय मधुकर कोळी याने संदीप सुभाष सपकाळे हा समोर थुंकला. याचे वाईट वाटून विजय कोळी याने संदीपला शिवीगाड करून त्याच्या पोटात चाकू मारला. त्यात तो जखमी झाला. ही घटना २०१३ मध्ये घडली होती. याप्रकरणी विजय कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. न्यायालयात दाखल फौजदारी खटल्यात आरोपी विजय कोळी याच्याविरूद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायाधिश संजीव सरदार यांनी त्याला दोन वर्र्षे सश्रम कारावासाची शिक्षा, तीन हजाराचा दंड व पीडितास १५ हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश गुरुवारी दिला.
या खटल्यात सरकारी वकील नीलेश जाधव यांनी आठ साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नरसिंग चव्हाण, पो.कॉ.रवींद्र सपकाळे यांनी काम पाहिले.

Web Title: Two and a half years of imprisonment from spit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.