गुन्हेगार पडताळणीत सापडले हद्दपार केलेले दोन आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:20 IST2017-07-30T13:19:51+5:302017-07-30T13:20:53+5:30
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करीत असताना शहरातून एक वर्षासाठी हद्दपार झालेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांना आढळून आले.

गुन्हेगार पडताळणीत सापडले हद्दपार केलेले दोन आरोपी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करीत असताना शहरातून एक वर्षासाठी हद्दपार झालेले कैलास चंदू साबळे (वय 22 रा.पिंप्राळा, हुडको, जळगाव) व शेख हारुन शेख इब्राहीम (वय 35 रा.गेंदालाल मील, जळगाव) हे दोन सराईत गुन्हेगार पोलिसांना आढळून आले. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी झाली.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दर शनिवारी प्रत्येक विभागात एका पोलीस स्टेशनला गुन्हेगारांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारची गुन्हेगार पडताळणी व आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी शहरातील संवेदनशील भागात कोम्बीग ऑपरेशन राबविले. पहाटेर्पयत हे ऑपरेशन सुरु असताना शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या पथकातील सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रीतमसिंग पाटील, दुष्यंत खैरनार, सुनील पाटील, अमोल विसपुते व संजय शेलार यांच्या पथकाला पहाटे पाच वाजता गेंदालाल मील भागात कैलास साबळे व शेख हारुन शेख इब्राहीम हे दोन्ही हद्दपार आरोपी आढळून आले.