भडगाव रस्त्यावरील चोरीप्रकरणी २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:04+5:302021-05-30T04:15:04+5:30

या घटनेचा तपास पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे करीत असताना टेम्पोचा चालक विशाल संजय तेली याच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या. यावरून ...

Two accused in Bhadgaon road theft case in police custody | भडगाव रस्त्यावरील चोरीप्रकरणी २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भडगाव रस्त्यावरील चोरीप्रकरणी २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेचा तपास पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे करीत असताना टेम्पोचा चालक विशाल संजय तेली याच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या. यावरून त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला असता या घटनेत चालकासह अन्य तीन असा एकूण चार आरोपींचा सहभाग आढळून आला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर टेम्पोचालक विशाल संजय तेली व सागर संजय पाटील (दोघे पिपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) या दोघांना अटक करण्यात आली, अन्य दोन संशयित फरार आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस ताब्यात असलेल्या दोघा संशयितांनी प्रत्येकी २० हजार रुपये घेतल्याचे कबूल केले आहे.

टेम्पोचालक विशाल संजय तेली व सागर संजय पाटील (दोघे पिपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) यांना भडगाव न्यायालयात हजर केले असता १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे करीत आहेत.

Web Title: Two accused in Bhadgaon road theft case in police custody