चाळीसगावला बावीस वर्षीय युवतीने घेतली जैन दिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 13:23 IST2018-03-30T13:23:18+5:302018-03-30T13:23:18+5:30
महावीर जयंती उत्सव

चाळीसगावला बावीस वर्षीय युवतीने घेतली जैन दिक्षा
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जळगाव, दि. ३० - सकल जैन समाजातर्फे गुरुवारी भगवान महावीर यांची जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाली. यात २२ वर्षीय युवतीने दिक्षा घेतली. भगवान महावीरांच्या प्रतिमेची शहराच्या विविध भागातून मिरवणुक काढण्यात आली.
सकाळी सात वाजता घाटरोड परिसरातील जैन स्थानकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. पुढे सदर बाजार मार्गे स्टेशन रोडवरुन जैन मंदीर आणि येथुन राष्ट्रीय कन्या शाळेत सकाळी ९ वाजता सांगता झाली. यावेळी महाविरांचा जयजयकाराने परिसर दुमदुमला.
पुज्य गुलाब मुनीजी मा.सा. आणि पुज्य सुवर्णा श्रीजी मा.सा. यांच्या उपस्थित आरती छाजेड या २२ वर्षीय युवतीने दिक्षा घेतली. हा सोहळादेखील पार पडला. अध्यक्ष पारस चोरडिया, उपाध्यक्ष प्रेमचंद खिंवसरा, सचिव महेंद्र अचलिया, सहसचिव नरेंद्र दोषी, खजिनदार नैनसुख कोठारी यांच्यासह विजय चोपडा, नीलेश कांकरिया, राकेश उमेदमल, कपिल लोडाया, मनीष लोडाया, संदीपकुमार दगडा यांनी जयंती उत्सव सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले.