मिनी ट्रक उलटल्याने 22 भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 14:39 IST2017-03-30T14:39:23+5:302017-03-30T14:39:23+5:30
उजनी दग्र्यावर नवस फेडण्यासाठी जात असलेल्या भाविकांची मिनी ट्रक पलटी झाल्याने 22 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.
मिनी ट्रक उलटल्याने 22 भाविक जखमी
बोदवड, दि.30- उजनी दग्र्यावर नवस फेडण्यासाठी जात असलेल्या भाविकांची मिनी ट्रक पलटी झाल्याने 22 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरु आहेत.
उजनी दग्र्यावर नवस फेडण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील भाविक जात होते. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मिनी ट्रक एमएच 19 बीएम 4206 हा उलटी झाला.ट्रकमध्ये असलेले 22 भाविक जखमी झालेले आहेत.
अपघातानंतर जखमींना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यात कस्तुराबाई राठी, राजकन्या पाखरे, सुभाष सैंदाणे, नंदिनी जवरे, भावेश राठोड, विष्णु राठोड, संदीप राठोड, दिपाली राठोड, विठ्ठल राठोड, प्रकाश राठोड, सुनिता पाखरे, दीपक पाखरे, रामभाऊ पाखरे, पद्माबाई पाखरे, जिजाबाई धरे, ओम कोल्हे, कविता पाखरे, गजानन चौबे, सुभाष सैंदाणे यांच्यासह 22 भाविकांचा समावेश आहे.