शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महालखेड्यातील एकलव्याने घडविले १२ पोलीस कर्मचारी, प्रशिक्षणातून तयार झाली तरुणांच्या यशाची मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 8:19 AM

स्वयंअध्ययन व स्वयंप्रशिक्षण घेत मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा गावातील आधुनिक एकलव्य असलेल्या दीपक वाघ या तरूणाने सुरु केलेल्या प्रशिक्षण केंद्रामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल १२ तरुणांचा पोलीस दलात प्रवेश झाला आहे

विनायक वाडेकर मुक्ताईनगर : स्वयंअध्ययन व स्वयंप्रशिक्षण घेत मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा गावातील आधुनिक एकलव्य असलेल्या दीपक वाघ या तरूणाने सुरु केलेल्या प्रशिक्षण केंद्रामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल १२ तरुणांचा पोलीस दलात प्रवेश झाला आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे. हे गाव सध्या पोलिसांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील जवळपास बारा विद्यार्थी ही पोलीस व समकक्ष दलात रुजू झाले आहेत.इच्छापूर-निमखेडी येथील ज्ञानपूर्ण विद्यालयाचा विद्यार्थी दीपक भीमराव वाघ याचे बालपणापासून पोलीस बनण्याचे ध्येय होते. त्यामुळे त्याने अकरावीपासूनच पोलीस भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम व प्रशिक्षणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने गावाला लागून असलेल्या एका छोट्याशा खोलीमध्ये स्व:ता अध्ययनाला सुरुवात केली. स्व:ता अध्ययन करीत असतानाच इतरांचेही अध्ययन व्हावे या दृष्टिकोनातून इतर विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.त्यातूनच २०१३/१४ च्या पोलीस भरतीमध्ये त्याला यश मिळाले. दीपकची नियुक्ती कारागृह पोलीससाठी झाली. सध्या तो गडचिरोली येथे आपली सेवा बजावत आहे. दीपक हा विद्यार्थ्यांना दिवसभर मार्गदर्शन करीत होता. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गावाजवळच असलेल्या एका टेकडीवर शारीरिक चाचणीसाठी नेत असे. तेथे धावणे, गोळाफेक, लांब उडी, शंभर मीटर धावणे या सर्व चाचण्या तो स्वत: घेत होता.दीपकने याबाबत कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतांना, मात्र त्यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. सद्यस्थितीला महालखेडा या गावातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवल्या प्रशिक्षण केंद्रातून पोलिस दलात व अन्य समकक्ष दलात नऊ विद्यार्थी हे कायमस्वरूपी नोकरीवर लागलेले आहेत. तर तीन विद्यार्थी हे अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत. भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थी रोज पहाटे चार वाजता उठून नियमितपणे शारीरिक चाचणी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करीत आहेत.

महालखेड्याची ओळख पोलिसांचे गावसद्यस्थितीला दीपक वाघ , विकी वाघ, नितीन वाघ, समाधान किरण कासवेकर, विनोद पाटील, चेतन पाटील, विवेक कांडेलकर, गणेश घुले व सुमीत तायडे हे तरुण पोलीस दलात रुजू झाले आहेत. तर मयूर तायडे,महादेव बेलदार, विश्वास पाटील हे तीन तरुण प्रतीक्षा यादीत आहेते. नऊ कायमस्वरूपी व तीन तरुण प्रतीक्षा यादीत असल्याने या गावाचे नाव पोलिसांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मुक्ताईनगरचे तत्कालीन उपनिरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याचे वाघ सांगतात.

स्व:ता शिकणे व इतरांना शिकवणे या दोन्ही गोष्टीतून आपलाही अभ्यास होतो. प्रशिक्षणाची देखील तयारी होते. या हेतूने प्रेरित होऊन हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले पोलीस भरती केंद्र गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.-दीपक वाघ, पोलीस कर्मचारी.