आठ गावांमध्ये बारा घरे पडली, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:56+5:302021-09-09T04:22:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आठ गावांमधील १२ घरे पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. ...

आठ गावांमध्ये बारा घरे पडली, लाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आठ गावांमधील १२ घरे पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी झालेल्या पावसाने दुसरीकडे पिंपऱ्या नाल्याला पूर आल्याने प्रसाद नगर, पिंपळे रोड, ढेकू रोड परिसरात काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.
निवृत्ती साहेबराव पाटील (जवखेडा), दगडू तुकाराम पाटील (शिरूड), इंदूबाई पाटील (वावडे), सुखदेव भिवसन पाटील (रामेश्वर खुर्द), झुलाल गिरीधर पाटील, सुभाबाई लोटन पाटील, बाजीराव मनसाराम पाटील, माधवराव साहेबराव पाटील, बापू मन्साराम पाटील, अनिल गोपीचंद पाटील (जानवे) यांच्या घरांची पडझड झाली तर शांताराम पुना पाटील (रढावण) यांची गाय मयत झाली आहे.
अंचलवाडी येथील आत्माराम पाटील यांच्या घराची भिंत, भाऊसाहेब श्रीराम पाटील यांची गोठ्याची भिंत पडली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अमळनेर शहरात प्रसाद नगर भागात घरापर्यंत पाणी पोहोचले होते. यामुळे बराचवेळ रस्ता बंद होता. ढेकू रोड आणि पिंपळे रोड पुलावरून पाणी वाहत होते. एलआयसी कॉलनी, उत्कर्ष नगर, संत सखाराम महाराज नगर, टेलिफोन कॉलनी, विठ्ठल नगर आदी भागात पाणी शिरल्याने येण्या-जाण्याचा रस्ता बंद होता. सम्राट हॉटेलजवळ दिनेश बडगुजर यांच्या घरात गुडघाभर पाणी घुसले होते.