टरबुजाची शेती
By Admin | Updated: May 31, 2017 14:07 IST2017-05-31T14:07:58+5:302017-05-31T14:07:58+5:30
टरबुजाची शेती करून एकरी 75 हजार रुपये निव्वळ नफा कमाविण्याची किमया साधली आह़े

टरबुजाची शेती
राम जाधव / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 31 - कृषी पदवीचे घेतलेले शिक्षण व शेती क्षेत्रातील असलेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे प्रमोद अमृतराव पाटील यांनी टरबुजाची शेती करून एकरी 75 हजार रुपये निव्वळ नफा कमाविण्याची किमया साधली आह़े त्यांनी केवळ उत्पादनच घेतले नाही, तर आपल्याकडे असलेल्या सर्व साधनांचा उपयोग करून प्रत्यक्ष ग्राहकांना माल विकण्याचेही तंत्र अवगत केल्याने ते यशस्वी राहिल़े बाजारात कमी दर मिळत असला, तरी पाटील यांनी स्वत: आपल्या मालाची विक्री केल्याने त्यांना टरबुजाचे उत्पादन फायद्याचेच राहिल़े
नेरी बुद्रूक येथील प्रमोद पाटील यांनी बी़एस्ससी़ अग्री या कृषी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पारंपरिक शेती न करता शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्त्पन्न घेतले आह़े त्यानंतर त्यांनी जळगाव येथे कृषी उत्पादनांची पाटील बायोटेक नावाची कंपनीही स्थापन केली आह़े येथून 100च्या जवळपास कृषी उत्पादनांची निर्मिती होत़े मात्र शेतीमध्ये अजूनही नवनवीन प्रयोग करण्याचा छंद त्यांना आह़े त्यानुसारच त्यांनी 2014मध्ये पहिल्यांदा 5 एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली होती़ सुरुवातीला पक्ष्यांनी बिया खाल्ल्या, नंतर रोपे वाढवून लावल्यावर गारपीट झाली, तरी खचून न जाता यावर मात करीत टरबुजाचे तीन वर्षात चांगले उत्पन्न मिळविल़े
यावर्षी त्यांनी जानेवारी महिन्यात टरबुजाची 14 एकर क्षेत्रावर लागवड केली़ यामध्ये त्यांना एकरी 28 टनार्पयत उत्पादन आल़े त्यापैकी पहिल्या प्रतिवारीच्या 20 टन मालाला 6 रुपये प्रतिकिलो दर मिळाला़ तर उर्वरित मालाला 3 रुपये प्रतिकिलो दर मिळाला़ एकरी 65 हजार रुपये खर्च वजा जाता त्यांना 75 हजार रूपये सरासरी निव्वळ उत्पन्न मिळाल़े
खतांचे व्यवस्थापन
सुरुवातीला त्यांनी जमिनीची मशागत केल्यानंतर जमिनीच्या प्रतिनुसार एकरी 100 किलो डीएपी (18:46:00), पोटॅश 75 किलो, दाणेदार ह्युमॉल 30 किलो, गंधक 7 किलो, कॅल्शियम नायट्रेट 10 किलो असा बेसल डोस वापरला़ मल्चिंग कागद टाकून केलेल्या लागवडीनंतर 20 दिवसांनी ह्युमॉल, कॅल्शियम नायट्रेट व गंधक यांची एकत्रित असलेली ‘अमृत ड्रिचिंग कीट’ दर 15 दिवसांनी तीन वेळा दिली़ तसेच 19:19:19, 12:61:00, 13:40:13, 00:52:34 अशी विद्राव्य खते 5 किलो दर 4 दिवसांनी टप्प्याटप्याने दिली.
5 बाय 1़25 अशा अंतरावर त्यांनी सुरुवातीला 14 एकर नंतर 13 एकर आणि आता पुन्हा 14 एकरवर टरबुजाची लागवड केली आह़े एकरी साधारणत: 7000 रोपांची लागवड केली़
60 दिवसांच्या या पिकाला दरम्यानच्या काळात अळी व किडींच्या नियंत्रणासाठी 4 वेळा कीटकनाशकांची फवारणी केली़ तसेच बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्ये व वनस्पती वाढ नियंत्रकांची आलटून पालटून फवारणी केली़
पाटील यांनी पहिले लावलेल्या 14 एकर क्षेत्रातील टरबुजाला एकरी 65 हजार रुपये असा खर्च येऊन एकरी 75 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आह़े त्यानुसार त्यांना 14 एकरात 10 लाख 50 हजारांचे उत्पन्न आल़े मात्र, वाढलेल्या तापमानामुळे नंतर लागवड केलेल्या 13 एकर क्षेत्रातील उत्पादन घटल़े त्यामुळे एकरी केवळ 20 टन उत्पन्न मिळाल़े, तर याच मालालाही सरासरी प्रतिनुसार 3 व 5 रुपये दर मिळाला़ त्यामुळे या क्षेत्रातील उत्पन्न त्यांना कमी आल़े मात्र खचून न जाता त्यांनी पुन्हा 14 एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली आह़े चांगले उत्पादन मिळून येणा:या रमझान महिन्यात चांगला दरही मिळेल, अशी अपेक्षा प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली आह़े
अमृत फार्मचे टरबूज ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून पुढील वर्षी मार्च ते मे या तीन महिन्या दरम्यान 100 दिवस टरबूज ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. तसेच पाटील बायोटेक तंत्रज्ञान केमिकल विरहीत 2 टन द्राक्ष विक्री केले असून पुढील वर्षी द्राक्ष, डाळिंब यांचेही उत्पादन निर्मिती करण्याचा संकल्प पाटील बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शेतक:याला माल पिकविता येतो, मात्र त्याची विक्री करता येत नाही़ याला काहीअंशी प्रमोद पाटील यांनी अपवाद ठरत टरबूज विक्रीसाठी सर्वशक्ती वापरून या समस्येवरही ते भारी पडल़े दिल्लीच्या एका व्यापा:याने शेतातून माल खरेदी करताना तयार झालेला माल बाजूला काढून टाकला होता़ त्यामुळे पाटील यांनी त्या वेळी काही माल आपल्या गाडीत टाकून जळगावमध्ये आणला व आपल्याच कंपनीतील कर्मचा:यांना विकला़ फळ रसाळ व गोड असल्यामुळे त्यांच्याकडून मागणी वाढली व यातूनच त्यांना आपला माल आपणच विकण्याची कल्पना सुचली़ त्यानुसार त्यांनी जळगावातील बहुतेक किराणा दुकानदारांना प्रत्यक्ष भेटी देऊन टरबुजांची विक्री करण्यासाठी प्रोत्साहित केल़े पुढे त्यांना प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी शहरातील बहुतेक सुपर शॉपींमध्येही विक्रीसाठी टरबूज दिले आहेत़ टरबूजची विक्री जळगाव शहरासह पुणे, औरंगाबाद या मोठय़ा शहरातही होत आहे. यातून त्यांना 20 रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला़, असे त्यांनी जवळपास 75 टन टरबूज विकल़े त्यातून त्यांना 15 लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितल़े