क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण शोध अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST2020-12-04T04:41:50+5:302020-12-04T04:41:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महाराष्ट्र शासन व महानगरपालिकेतर्फे १ ते १६ डिसेंबर पर्यंत शहरात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण ...

क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण शोध अभियानाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महाराष्ट्र शासन व महानगरपालिकेतर्फे १ ते १६ डिसेंबर पर्यंत शहरात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. बुधवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सकाळी दीपप्रज्वलन करून आणि धन्वंतरी देवी व छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक डॉ.विरेन खडके, महेश चौधरी, शहर वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना डॉ.राम रावलानी यांनी, जळगाव शहरात अभियान कसे राबविले जाणार आहे याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी डॉ.मनिषा उगले, जिल्हा समन्वयक कमलेश अमोदेकर, डॉट प्लस पर्यवेक्षक दीपक नांदेडकर, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मिलिंद भोळे, प्रशांत मोरे व इतर क्षयरोग कर्मचारी तसेच कुष्ठरोग पर्यवेक्षक एन.आर.पाटील, हेमंत कोळी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.