रेल्वे रुळावर मोठे दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न ?

By Admin | Updated: May 6, 2017 18:50 IST2017-05-06T18:50:51+5:302017-05-06T18:50:51+5:30

पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान रेल्वे रुळावर मोठे दगड ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला

Trying to kill big stones on the railway track? | रेल्वे रुळावर मोठे दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न ?

रेल्वे रुळावर मोठे दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न ?

ऑनलाइन लोकमत

नगरदेवळा, जि. जळगाव, दि. 6 - नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील वडगाव खुर्द ते बाळद दरम्यानच्या खांबा क्रमांक 355जवळ अज्ञात व्यक्तीने पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान रेल्वे रुळावर मोठे दगड ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी येणा:या इगतपुरी- भुसावळ एक्सप्रेसच्या संरक्षक पिंज:याला धडकून दगडाचे तुकडे तुकडे झाले. रेल्वे गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
 दगडाची धडक लागल्याने इगतपुरी- भुसावळ एक्सप्रेसच्या व्हक्युम नळीला बाधा होऊन घटना  स्थळावर बराच वेळ गाडी थांबवून होती. बिघाड काढून गाडी रवाना करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर  रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. यामध्ये काही घातपातचा प्रकार तर नसावा अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली. 

Web Title: Trying to kill big stones on the railway track?