कन्नड घाटात ट्रक दरीत कोसळला, चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 22:24 IST2019-12-12T22:24:48+5:302019-12-12T22:24:54+5:30
चाळीसगाव : कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतारावरुन औरंगाबादहून चाळीसगावकडे येत असताना ट्रकचे (एमएच-२०-सीटी-०३०६) ब्रेक निकामी झाले. यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा ...

कन्नड घाटात ट्रक दरीत कोसळला, चालक ठार
चाळीसगाव : कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतारावरुन औरंगाबादहून चाळीसगावकडे येत असताना ट्रकचे (एमएच-२०-सीटी-०३०६) ब्रेक निकामी झाले. यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ती खोल दरीत कोसळली. यात चालक आसिफ नवाज पठाण (वय २२) हा ठार झाला. अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला.
अपघातस्थळी पोलिस कर्मचारी तातडीने दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने दरीत कोसळलेली गाडी काढण्यात आली. वाहतुकही सुरळीत केली गेली. ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.