बॅण्ड पथकाच्या वाहनास ट्रकची धडक, 13 जण जखमी
By Admin | Updated: May 17, 2017 18:15 IST2017-05-17T18:15:44+5:302017-05-17T18:15:44+5:30
हरताळे फाटय़ालगत अपघात होऊन बॅण्ड पथकातील 13 जण जखमी झाले

बॅण्ड पथकाच्या वाहनास ट्रकची धडक, 13 जण जखमी
ऑनलाइन लोकमत
मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 17 - अकोला येथे लग्न समारंभ आटोपून परतणा:या अमळनेर येथील हबीब ब्रास बॅण्ड पार्टीच्या वाहनास मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे फाटय़ालगत अपघात होऊन बॅण्ड पथकातील 13 जण जखमी झाले. हा अपघात आशिया महामार्ग क्र.46 वर बुधवारी सकाळी पाऊणे सात वाजता झाला. जखमीतील पाच जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
बॅण्ड पथकाच्या या वाहनाला अज्ञात ट्रकने धडक देऊन ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. यात बॅण्ड पथकाचे वाहन रस्त्याच्याकडेला जावून उलटले. यात वाहनाचे जबर नुकसान होऊन अकबर खाँ इमरान खाँ, दादाराव कैलास जाधव, मंगल शिरसाठ, अनिल शिरसाठ, भूषण चंदनशिव, सागर सपकाळे, दिलीप थोरात, शकील पटेल, अभिमन्यू सोनवणे, आबीद हुसेन, प्रकाश शिरसाठ, अशोक सावळे, कैलास वाघ हे 13 जण जखमी झाले. जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील पाच जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले.