ट्रक व खाजगी वाहनाची धडक; पारोळ्यानजीक अपघातात १३ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 19:19 IST2022-02-09T19:19:32+5:302022-02-09T19:19:44+5:30
पारोळा जि.जळगाव : ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनाची समोरासमोर धडक झाली. यात १३ जण गंभीर जखमी झाले. ...

ट्रक व खाजगी वाहनाची धडक; पारोळ्यानजीक अपघातात १३ जण जखमी
पारोळा जि.जळगाव : ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनाची समोरासमोर धडक झाली. यात १३ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महामार्गावर म्हसवे ता. पारोळानजीक घडली.
प्रवासी वाहतूक करणारे चारचाकी वाहन एरंडोलकडून धुळयाकडे जात होते तर त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकची या वाहनाला जोरदार धडक बसली. यात बादल अशोक पाटील (भुसावळ), चंद्रकला जोहरु रख्मे, जोहरु नथ्थु रख्मे, चंद्रकांत संतोष रख्मे (नाशिक.) वाहनचालक समाधान संपत पारधी (भालगाव ता धरणगाव), आसिफ नथू बागवान, रिजवान आसिफ बागवान, हुसेफ आसिफ बागवान, उमेर आसिफ बागवान (सर्व रा. म्हसावद ता. एरंडोल), उषाबाई छोटू पाटील, छोटू प्रल्हाद पाटील (दोघे रा. जैतपीर ता. अमळनेर) तसेच ट्रकमधील काशीराम गुठलिया व सुनील गुठलीया (दोघे रा. सेंधवा, मध्यप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.
सर्व जखमींवर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्वांना पुढील उपचारासाठी धुळे ,जळगाव येथे हलविण्यात आले आहे.