शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा-हातेड रस्त्यावर ट्रॉलाने कारला चिरडले, तिघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 15:42 IST

एक गंभीर जखमी : भल्या पहाटेची दुर्घटना

चोपडा : अंकलेश्वर - बºहाणपूर महार्गावर पहाटे अकुलखेडा -हातेड दरम्यान कार व ट्रॉलाचा भीषण अपघात झाला. कारमधील तिघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, १२ रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास अकुलखेडा जवळ चोपडा कडून जाणारी कार (क्रमांक एमएच- १४ सीएक्स ९०१३) ही चोपडा कडून शिरपूरकडे जात असतांना समोरून येणारा (एचआर- ५५ एन ४११०) या ट्रॉलाने धडक देत कारवर ट्राला चढवून देत कारचा अक्षरश: चेंदामेंदा केला. यात नामदेव गुलाब कोळी (मासरे) (३७) रा. मांजरोद ता शिरपूर, अनिल दशरथ जाधव (२२) बभळाज ता शिरपूर, किशोर गजानन बिºहाडे (३२) भाटपुरा ता. शिरपूर हे जागीच ठार झाले आहेत. तर सागर नरेंद्र पाटील (१९) अजनाड ता. शिरपूर हे गंभीर जखमी झाले. जखमीस उपजिल्हा रुग्णालयात आणून डॉ. सुरेश पाटील यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.सदर घटना घडली तेव्हा ‘लोकमत’ ची पेपर वाहतूक करणारी गाडी हातेड जात होती. त्यावरील मालक चालक सुनील पाटील यांनी ही माहिती वार्ताहर पी. आर. माळी व वार्ताहर संजय सोनवणे यांना कळविली असता दोघांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस नाईक संतोष पारधी, सुनील पाटील, सुनील कोळी, विलेश सोनवणे व मधुकर पवार यांनी घटनास्थळ गठीत त्याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉला बाजूला ढकलीत कारमधील चौघांना बाहेर काढले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर बडगुजर व उपजिल्हा रुग्णलयातील विच्छेदक प्रशांत पाटील या दोघांनी जखमी व मृतकांचे शव कारचा पत्रा कापून बाहेर काढले त्यात हे दोघे जखमी झालेत. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत जखमीस तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले.दरम्यान तिघा मृतकांचे शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील व डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात