शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

त्रिमूर्ती महाविद्यालयात मधुमेह विषयावर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 19:11 IST

जळगाव । त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी महाविद्यालयात ‘मधुमेह... समज व गैरसमज' या विषयावर व्याख्यानाचे ...

जळगाव । त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी महाविद्यालयात ‘मधुमेह... समज व गैरसमज' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळे पुण्यातील डॉ. रवींद्र मते यांनी विद्यार्थ्यांना मधुमेह या विषयी मार्गदर्शन करत त्यांची आरोग्य तपासणी केली. प्रसंगी महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला.मधुमेह या आजाराविषयी अनेकांमध्ये समज व गैरसमज आहे. यासाठी हा व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन मनोज पाटील, फामार्सीचे प्राचार्य हर्षल तारे, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिनेश पाटील उपस्थित होते. विद्याथ्यार्ना मार्गदर्शन करताना डॉ. मते यांनी सांगितले की, मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असला तरी सर्वसामान्यांमध्ये मात्र त्याबाबत अजूनही अनभिज्ञता व गैरसमज आहेत. केवळ साखर खाल्ल्याने, वजन वाढल्याने व कुटुंबात एखाद्याला मधुमेह असेल तरच मधुमेहाची लागण होते, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. जीवनशैली, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे होत असून कोणत्याही स्वरूपाचा मधुमेह हा पूर्णपणे बरा होऊ शकत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर त्यांनी मधुमेह कशाने व कसा होतो त्याची लक्षणे कोणती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रसंगी पोषक आहार, नियमित योगा, व्यायाम व उत्तम मानसिक स्वास्थ्य ही निरोगी आरोग्याची चतु:सूत्री असल्याचे प्राचार्य तारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश चौधरी यांनी केले तर प्रा. महेश हरळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार देशमुख, डॉ. डी.जे. पाटील, सुरेश पाटील यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव