शेतकऱ्यांचा समर्थनार्थ काढण्यात येणार तिरंगा रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:12+5:302021-02-05T06:02:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याचा विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन करत ...

शेतकऱ्यांचा समर्थनार्थ काढण्यात येणार तिरंगा रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याचा विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा समर्थनार्थ मंगळवारी शहरातील विविध संघटनांकडून आंदोलन व रॅली काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ‘किसान तिरंगा रॅली’चे आयोजन कऱण्यात आले आहे, तर भारतीय संविधान बचाव सेनेकडून सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता निघणाऱ्या किसान तिरंगा रॅलीत शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रॅलीची सुरुवात रेल्वे स्टेशनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून होणार आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रॅलीची सांगता होणार आहे. यामध्ये परिसरातील गावांमधील शेतकरी बांधकही सहभागी होणार आहेत, तसेच कृषी कायदा रद्द करण्याची मागणीही या रॅलीद्वारे करण्यात येणार आहे.
कोट..
दिल्ली येथील किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ शहरात किसान तिरंगा रॅली काढण्यात येणार असून, या रॅलीसाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली आहे.
- मुकुंद सपकाळे, अध्यक्ष, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा
या रॅलीसंदर्भात आमच्याकडे कोणताही अर्ज आलेला नाही. कोरोना काळात रॅलीला बंदी असून, या रॅलीलाही परवानगी देता येणार नाही.
- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी