शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 22:00 IST

चोपडा : वसतिगृह प्रवेश प्रकरण

चोपडा : वसतिगृह प्रवेशाबाबत तसेच इतर मागण्यांसंदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले होते. विविध १२ मागण्यांपैकी वसतिगृह प्रवेशाच्या मागणीसंदर्भात जादा प्रवेशाचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यातर्फे मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.११ रोजी दुपारी १२ वाजेपासून आदिवासी विद्यार्थी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले होते. तत्पूर्वी दुपारी शासकीय विश्रामगृहापासून हे विद्यार्थी मोर्चाने उपोषणस्थळी आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कुणीही अधिकारी उपोषणकर्त्यांच्या भेटीला न आल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला होता.@लेखी आश्वासनानंतर आवरला संतापप्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना जागा वाढवून प्रवेश दिला जाईल, या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाभरातील वसतिगृहातील विद्यार्थी संख्येचा आढावा घेतल्यानंतर इतर तालुक्यांतील रिक्त जागा चोपडा वसतिगृहाला वर्ग करण्यात येतील, असे लेखी आश्वासन सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. डी. चौधरी यांनी दिले. त्यानंतर उपोषण रात्री ८.३० वाजता स्थगित करण्यात आले.तालुक्यातील ६५ मुले, ६० मुली वसतिगृहात प्रवेशापासून वंचित आहेत. तसेच वसतिगृहातील शौचालय साफसफाई होत नाही. ती व्हावी, विद्यार्थ्यांना टॅलीचे प्रशिक्षण मिळावे, वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता तत्काळ दिला जावा आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. याबाबत २६ आॅगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन दिले होते व आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र अडचणी सोडविण्याचा प्रयत्न झाला नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दारासिंग पावरा, उपाध्यक्ष सागर पावरा, गोपाळ सोनवणे, निलेश भालेराव, सचिव संजय पाडवी, युवा सचिव राजेश बारेला, चोपडा तालुकाध्यक्ष मिथुन पावरा, युवा तालुकाध्यक्ष विनेश पावरा, उपाध्यक्ष सचिन पावरा, कालुसिंग पावरा, रेहांजल बारेला, आदेश पावरा, महेंद्र पावरा, शरद पावरा, मुन्नी पावरा, सविता पावरा, संगीता पावरा, सुनिता पावरा यांच्यासह सुमारे ९० मुले व ४८ मुली उपोषणस बसले होते.