आदिवासी विद्याथ्र्याचा ‘वनवास’ संपेना!
By Admin | Updated: October 25, 2015 00:17 IST2015-10-25T00:17:57+5:302015-10-25T00:17:57+5:30
शिक्षणासाठी आलेल्या सहाशे अतिरिक्त विद्याथ्र्याना राहण्यासाठी अजूनही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही़ त्यामुळे आदिवासी विद्याथ्र्याचा वनवास अजूनही कायम असल्याचे दिसून येत आह़े

आदिवासी विद्याथ्र्याचा ‘वनवास’ संपेना!
धुळे : शहरात विविध खेडय़ापाडय़ातून शिक्षणासाठी आलेल्या सहाशे अतिरिक्त विद्याथ्र्याना राहण्यासाठी अजूनही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही़ त्यामुळे आदिवासी विद्याथ्र्याचा वनवास अजूनही कायम असल्याचे दिसून येत आह़े जिल्ह्यात आदिवासी विद्याथ्र्यावर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आह़े या वर्षी सहाशे विद्याथ्र्याना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही़ त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघटनांनी वारंवार आंदोलने करून प्रशासनाला निवेदनेही दिली़ त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी ए़बी़ मिसाळ यांनी स्वत: आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्याशी संपर्क साधला होता़ मात्र अजूनही विद्याथ्र्याच्या राहण्याची व्यवस्था झालेली नाही़ आदिवासी प्रकल्प विभागात गेल्या तीन वर्षात सुमारे दीडशे कोटींच्या निधीची अनियमितता जिल्हाधिका:यांनी केलेल्या लेखापरीक्षणात समोर आली आह़े त्याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी अजून एकाही कर्मचा:याने या नोटिसीला उत्तर दिलेले नाही़ आदिवासी विभागातील कर्मचा:यांकडून याबाबत एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे नोटिसांना उत्तर देण्यासही टाळाटाळ सुरू आह़े