शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

घरातून उचलून नेत केला आदिवासी बालिकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 7:59 PM

किनगाव येथील घटना : आरोपीस केली पोलिसांनी अटक

यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील नऊ वर्षीय आदिवासी बालिकेस आरोपी गुलाब उर्फ फिरोज उर्फ फिऱ्या सलीम मन्यार याने २४ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घरातून उचलून नेत तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी सदर बालिकेच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसीटीसह बाललैंगीक अत्याचार प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी लगेचच अटक केली आहे.या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील चुंचाळे रस्त्यावरील रहिवासास असलेल्या एका आदिवासी कुटूंबियातील नऊ वर्षीय बालिका ही तिचे वडील विहिर खोदावयास कामानिमित्त गेल्याने ती रात्री किनगावी आत्याच्या घरी झोपण्यास गेली होती.यादरम्यान गावातील गुलाब मन्यार याने २४ जूनच्या पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास या बालिकेच्या आत्याच्या घरात घुसून बालिकेचे तोंड दाबून तिला उचलून घराबाहेर नेले.या बालिकेने आपल्या बचावासाठी आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडा-ओरड केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपीने तिच्याशी अंगलट करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.याप्रकरणी पिडीत बालिकेने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, हे.कॉ. संजय तायडे करीत आहेत. पोलीस या आरोपीकडून माहिती घेत आहे.दरम्यान, या घटनेबाबत आरोपीचा निषेध केला जात असून त्याला कडक शासन व्हावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.