आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव पाडलीत

By Admin | Updated: May 18, 2014 01:22 IST2014-05-18T01:22:17+5:302014-05-18T01:22:17+5:30

धडगाव : आदिवासी विविध सामाजिक संघटना प्रेरित सातपुडा परिसर व पाडली येथील ग्रामस्थ यांच्यातर्फे आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव आयोजित केला आहे.

Tribal Cultural Youth Festival | आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव पाडलीत

आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव पाडलीत

धडगाव : आदिवासी विविध सामाजिक संघटना प्रेरित सातपुडा परिसर व पाडली येथील ग्रामस्थ यांच्यातर्फे आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव रविवार व सोमवारी असे दोन दिवस पाडली, ता.धडगाव येथे होईल. अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी या महोत्सवाचे उद्घाटन करतील. गुजरात एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी अध्यक्षस्थानी असतील. यात वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. त्यात साहित्यिक वाहरू सोनवणे हे आदिवासी समाजाचा इतिहास व आजची स्थिती मांडतील. तर आदिवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुहास नाईक ‘बोगस आदिवासींची घुसखोरी : एक गंभीर समस्या’, महासंघाचे सचिव डॉ.जर्मनसिंग पाडवी ‘आरोग्याचे महत्त्व’, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रंजना पावरा ‘आदिवासी महिलांची सामाजिक समस्या’, वंदना वळवी ‘विकासासाठी महिलांचे सामाजिक योगदान’, अ‍ॅड.अभिजित वसावे ‘शासकीय आश्रमशाळेतील गंभीर समस्या’ या विषयावर विचार मांडतील. डॉ.दिलवरसिंग वसावे ‘चळवळीसाठी संघटनेचे महत्त्व’, वीरेंद्र वळवी ‘स्पर्धा परीक्षेचे महत्त्व’, माजी पोलीस अधीक्षक सुरूपसिंग ‘शिक्षणाचे महत्त्व’, अभियंता जेलसिंग पावरा ‘व्यसन : एक गंभीर समस्या’, धुळ्याचे भगवान वळवी ‘पेसा कायद्याचे महत्त्व’, धडगावचे अ‍ॅड.राजेंद्र वळवी ‘आदिवासीविषयक कायदे’, नर्मदा खोर्‍यातील कार्यकर्ते विजयसिंग वळवी नर्मदा परिसरात विस्कळीत झालेल्या लोकांच्या समस्या मांडतील. (वार्ताहर)

Web Title: Tribal Cultural Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.