धुळे कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: February 6, 2016 00:42 IST2016-02-06T00:42:36+5:302016-02-06T00:42:36+5:30
धुळे : जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या तुकाराम खामकर या कैद्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़

धुळे कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
धुळे : जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या 21 वर्षीय तुकाराम खामकर या तरुण कैद्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कैद्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आह़े खामकर याने सकाळी बॅरेक क्रमांक 2 च्या मागील भागात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ हवालदार पंडित बोरसे यांनी सहअपराधी बंदी भिला कोळापे याच्या मदतीने त्याला दवाखान्यात नेले. बलात्काराचा आरोपी तुकाराम खामकर याला भादंवि कलम 376, 305 अन्वये दोंडाईचा पोलिसात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात 25 ऑक्टोबर 2015 ला पोलिसांनी अटक केली होती़ त्यास जिल्हा कारागृहात 2 नोव्हेंबर 2015 रोजी दाखल करण्यात आले होत़े तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.