शहरं
Join us  
Trending Stories
1
"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
3
'फलंदाजांचा कर्दनकाळ' ट्रेंट बोल्टची निवृत्तीची घोषणा; तडकाफडकी घेतला निर्णय, IPLचे काय?
4
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
5
"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."
6
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी
7
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
8
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
9
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
10
वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी
11
मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या
12
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
13
ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'
14
शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग, निफ्टी-सेन्सेक्स ऑल टाईम हाय लेव्हलवर
15
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी
16
पाकिस्तानच्या बाबरच्या राजीनाम्याची मागणी; पण त्याच्या समर्थनार्थ भारतीय दिग्गज मैदानात
17
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड?
18
T20 WC 24, WI vs AFG  : एकाच षटकात ३६ धावा! निकोलस पूरनने रचला इतिहास, शतक मात्र हुकले
19
उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू
20
Investment Share Market : बाजारात कमाईची मोठी संधी, दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ

किमान तीन हजार रुपये निवृत्ती वेतनासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:44 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनचे विश्वस्त प्रभाकर बाणासुरे यांची माहिती

ठळक मुद्देतीन दिवसात मिळणार ‘पीएफ’ची रक्कमनिवृत्तीवेतन वाढीसह महागाई भत्ता

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - कर्मचारी भविष्य निधी संघटनचे सदस्य असलेल्या निवृतीवेतनधारकांना सध्या मिळणारे किमान एक हजार रुपये निवृत्ती वेतन अत्यंत तुटपुंडे असून त्यात वाढ करून ते किमान तीन हजार रुपये करण्यासाठी संघटनचा प्रयत्न आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनचे विश्वस्त प्रभाकर बाणासुरे यांनी दिली.‘लोकमत’च्या शहर कार्यालयात बाणासुरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली. ‘लोकमत’चे वरिष्ठ उप संपादक विकास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.निवृत्तीवेतन वाढीसह महागाई भत्ता२० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या अस्थापनेतील संघटीत असो वा असंघटीत कामगार हे कर्मचारी भविष्य निधी संघटनचे सदस्य होऊ शकतात. या कर्मचाºयांच्या वेतनातून १२ टक्के कपात होण्यासह अस्थापना मालकाचा १२ टक्के वाटा मिळून २४ टक्के रक्कम संबंधित कर्मचाºयाच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होत असतो. कर्मचाºयाचे निवृत्तीवेळी असलेले वेतन व त्याचा सेवा काळ यावर त्याचे निवृत्ती वेतन ठरते. त्यानुसार सध्या हे निवृत्ती वेतन किमान १ हजार रुपये आहे. ते अत्यंत तोडके असल्याने त्यात वाढ होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे प्रभाकर बाणासुरे यांनी सांगितले. यामध्ये ते किमान तीन हजार रुपये असावे व त्या सोबतच महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे बाणासुरे यांनी सांगितले.....तर डिसेंबर पूर्वी निवृत्ती वेतनात वाढसध्या निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणाºया निवृत्तीवेतनात केंद्र सरकारचा केवळ १.१६ टक्के वाटा आहे. निवृत्तीवेतन वाढ करीत असताना यात सरकारचाही सहभाग वाढणे आवश्यक असल्याचे बाणासुरे म्हणाले. त्यानुसार केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आपला वाटा वाढविला तर डिसेंबर पूर्वीच निवृत्तीवेतनात वाढ होऊ शकते, अशी सुखद माहितीही त्यांनी दिली.एका क्लिकवर पीएफची माहितीसंघटनच्यावतीने तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा कर्मचाºयांना करून दिला जात असून आपल्या भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती व्हावी यासाठी संघटनच्यावतीने अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. आपला क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलवरच भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळू शकेल, असेही बाणासुरे यांनी सांगितले.तीन दिवसात मिळणार रक्कमभविष्य निर्वाह निधीमधून रक्कम काढायची झाल्यास आता कर्मचाºयांना आॅनलाईन अर्ज करून तीन दिवसात ही रक्कम मिळू शकेल, अशीही माहिती बाणासुरे यांनी दिली. त्यानुसार जेवढी रक्कम काढायची आहे तेवढी रक्कम टाकून संपूर्ण माहिती अचूक भरून आॅनलाइन अर्ज करता येऊ शकतो. यासोबतच आॅनलाइन कर्मचाºयाचे नाव व इतर संपूर्ण माहिती अचूक उपलब्ध असल्यास निवृत्तीनंतर सातव्या दिवशी निवृत्ती वेतनही आता सुरू होत असल्याचे बाणासुरे म्हणाले. मात्र यासाठी अस्थापना व्यवस्थापनाने पुरेसी व अचूक माहिती पुरविणे, आधार कार्ड लिंक असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.निवृत्तांना मोफत वैद्यकीय सुविधाकर्मचारी भविष्य निधी संघटनच्या निवृत्तीधारकांसह त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बाणासुरे यांनी सांगितले. सध्या दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू असून लवकरच देशभरात तो लागू केला जाईल, असेही ते म्हणाले. यामध्ये ईएसआयसीच्या रुग्णालयांसह त्यांचा करार असलेल्या मोठ्या रुग्णालयांध्येही वैद्यकीय सेवा मिळू शकेल.पीएफवरील व्याजदर वाढीसाठी प्रयत्नसध्या भविष्य निर्वाह निधीवर मिळणाºया व्याजदरात कपात होत आहे. हे व्याज कर्मचाºयांना जास्त मिळावे, यासाठी संघटनच्यावतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार करण्यात आला. मात्र त्यास काहीसा विरोध झाल्याने सध्या ही गुंतवणूक थांबविली आहे. मात्र एक्सचेंज ट्रेडिशनल फंडमध्ये ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यातून परतावाही चांगला मिळत आहे. त्यामुळे पीएफवरील व्याज वाढून मिळण्यास यामुळे मदत होऊ शकते, असे बाणासुरे म्हणाले. पुढे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक झाल्यास संघटनचा प्रत्येक सदस्य शेअर मार्केटशी जोडला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कर्मचाºयांनी जागृत रहावेकर्मचारी भविष्य विधी संघटनचे सदस्य झाल्यास त्यात अस्थापना मालकाला १२ टक्के आपला हिस्सा द्यावा लागतो. त्यामुळे अनेक अस्थापना मालक संघटनचे सदस्य होण्याबाबत अनुत्सुक असतात. यामध्ये कर्मचाºयांचे नुकसान होते. त्यामुळे कर्मचाºयांनी जागृत रहावे, असे आवाहनही बाणासुरे यांनी केले. कर्मचाºयांसाठी तीन योजना असून यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी १९५२ या योजनेत निवृत्ती वेतन न मिळता केवळ जमा रक्कम व्याजासह मिळते. कर्मचारी पेन्शन फंड योजनेत निवृत्ती वेतन तर कर्मचारी भविष्य निधी विमा योजनेत निवृत्तीवेतन व सहा लाखापर्यंत विमा संरक्षणही मिळते, अशी माहिती बाणासुरे यांनी दिली.लहान अस्थापनांचाही होणार सहभागज्या ठिकाणी १० कामगार आहे, अशा अस्थापनाही आता कर्मचारी भविष्य निधी संघटनच्या सदस्य होऊ शकणार आहेत. सध्या ही मर्यादा २० असून लहान अस्थापनांमधील कर्मचाºयांना याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे बाणासुरे म्हणाले. यापुढे मूळ वेतनाऐवजी मूळ वेतन व मिळणाºया एकूण भत्यांची रक्कम यावरील १२ टक्के रक्कम ही भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही बाणासुरे म्हणाले.जळगावात प्रादेशिक कार्यालयकर्मचारी भविष्य निधी संघटनच्या सदस्यांना सोय व्हावी यासाठी जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी प्रादेशिक कार्यालय असावे, यासाठी ते जळगावात सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे बाणासुरे यांनी सांगितले.देशाच्या विकासात ८ लाख करोडचे भाग भांडवलकर्मचारी भविष्य निधी संघटन ही भारतीय आयुर्विमा महामंडळानंतर दुसरी मोठी आर्थिक उलाढाल असलेली संस्था आहे, असे बाणासुरे म्हणाले. संघटनच्यावतीने देशाच्या विकासात ८ लाख कोटींचे भाग भांडवल गुंतविले असल्याचे बाणासुरे म्हणाले. दर महिन्याला ५४३ कोटींची संघटनच्यावतीने गुंतवणूक केली जाते,असेही ते म्हणाले. देशातील १० लाख २४ हजार १८८ अस्थापना यात सहभागी असून १९ कोटी ३३ लाख ९१ हजार ८६० सदस्य असून यापैकी ४ कोटी १२ लाख ३७ हजार ३८४ सदस्य नियमित अंशदान जमा करतात, असे बाणासुरे यांनी सांगितेल. यात सर्वाधिक सदस्य संख्या ही महाराष्ट्राची असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव