कजगाव, ता. भडगाव : येथे अभाविपचा ७३वा वर्धापन दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिन यानिमित्त कजगाव येथे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ७३व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त कजगाव ब. ज. हिरण माध्यमिक विद्यालयापासून सुरुवात करून वेगवेगळ्या ठिकाणी शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, कजगाव मंडळ अधिकारी आर. पी. शेजवळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सरसंघचालक डॉ. निलेश पाटील, अभाविप जिल्हा सहसंयोजक सारंग पाटील, माऊली फाऊंडेशनचे सचिव देवेंद्र पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुरेश कोळी, दिनेश पाटील, ब. ज. हिरण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, विजय पाटील, कवी सुनिल गायकवाड, विजय गायकवाड, हर्षल महाजन, दीपक पाटील, दर्शन राजपूत, निवृत्ती राजपूत, भूषण पाटील, चैतन्य पाटील, कुणाल पाटील उपस्थित होते.
100721\10jal_6_10072021_12.jpg
वृक्ष लागवड करताना पोलीस निरीक्षक अशोक उतेकर व मान्यवर.