आगीत वृक्ष जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:59 IST2019-05-27T15:59:33+5:302019-05-27T15:59:39+5:30
यावल-भुसावळ मार्गावरील घटना

आगीत वृक्ष जळून खाक
यावल : यावल-भुसावळ रस्त्यावरील कोटेचा पाईप फॅक्टरी समोर रस्त्याच्या कडेस अज्ञाताने आग लावल्याने त्यात अनेक झाडे जळाली आहे. येथील माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा. मुकेश येवले रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास भुसावळकडून यावलकडे येत असतांना त्यांना आग लागलेली दिसताच त्यांनी भुसावळ अग्नीशमन दलाला कळवले.
अग्नीशमन दलाने आग विझविली. वाढीच्या वृक्षांची होळी होत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.